
पुरूषोत्तम मास कृष्ण संदेश
अशी लावतो तोआस
ज्ञान अज्ञानाचा होतो निरास
अवघे जीवन वाटते भास
एक होते पाप-पुण्याची रास!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
रामा रघुनंदना रे रामा रघुनंदना
तू मनभावना रे तू पतीतपावना
तुजवीण दुजी आस नाही मना
तूच दिसतो मला निरंतर
तूच जाणतो माझे अंतर
तू आत्मा रे मी शरीरांतर
तवनामाचा लागला छंद
तटतट तुटले रे सारे बंध
वेढून घेतो हा कोणता गंध
स्थळ काळाचे नाही बंधन
नित्य करते रे तुलाच वंदन
रघुराया तूच माझे स्पंदन !
श्रीकृष्णार्पणमस्तु !

संपूर्ण समर्पण !
यावर आपले मत नोंदवा