ती. व. भाईजी,
मला जे काही काल कळलं ते विलक्षण धक्कादायक आहे. मला स्वतःचीच लाज वाटती आहे. सर्वोच्च पदावर व्यक्तीची निवड करण्यासाठी आम्ही चुकत असू तर आमचा उपयोग काय भाईजी? आता तर अशी अवस्था झाली आहे की ‘माझं…’ असं अभिमानाने म्हणताही येत नाही आणि त्यागताही येत नाही. संकटात पडलेल्या आईला कसं सोडणार भाईजी?
भाईजी, माझी आता तुमच्यासमोर येण्याची हिंमत होत नाही हो. कारण दुर्देवाने मी या व्यवस्थेचा एक घटक आहे. भाईजी, मी काय करू? माझं बळ खूप कमी पडतंय. कलियुग असलं म्हणजे काय झालं भाईजी, माझ्या माय-माऊलीला असं भ्रष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही भाईजी. किती प्राणपणाने जपलं तुम्ही लोकांनी तिला! आम्ही तो वारसा सांगण्याच्या योग्यतेचे तरी आहोत का हो?
हे देवा, मला हे दुःख आता खरोखर सहन होत नाही. तू कृपा तरी कर, नाही तर माझा जीव तरी घे.
श्रीकृष्णार्पणमस्तु!
भाईजी कृष्ण म्हणाला, ‘असं काही नसतं ‘.
श्रीकृष्णार्पणमस्तु!
यावर आपले मत नोंदवा