विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

देवभेट

देवा तू भेटला की माझा दिवस सुंदर होतो बघ. असाच भेटत राहा, सुंदर होईल जगणं इतकंच मागणं!


देवा, तुझा सृष्टीत वास घडो माझ्या दृष्टीला नित्य तुझा सहवास

•| ॐ |•

कधी फिरते उलटे
कालगतीचे चक्र
प्रेमळ देवाची ही
होते भुवई वक्र

त्या जीवनदायी
लिंबात दिसते
त्रिशूल व सुदर्शन
घडते तेंव्हा नवसृजन!

संपूर्ण समर्पण!


http://youtube.com/post/UgkxVEksBrM0CDos9W_Dq1oI8m1LvmQQe7LQ?si=Clkx-UVqFbghp2g0

•| ॐ |•

कृष्ण संवाद

आज पहाटे पहाटे देव जरा निवांत बसलेले होते. म्हणलं चला जरा गप्पा तरी माराव्यात.
मी – “काय देवा, कसं काय आहे,बरं चाललय का?”
देव म्हणाला, ” हो, तुमच्याच कृपेने.”
(पहिल्याच बॉलवर देवाने माझी विकेट घेतली तशी मी सावध झाले.)
जरा अदबीनंच मी नमस्कार केला आणि विचारलं “देवा, रागावलात का हो?”
देव : छे…छे… रागवेल कसा? मी देव आहे. ‘देव म्हणजे देणारा’. तुम्ही काहीही मागावं आणि मी देत राहावं हा आपल्या देण्याघिण्याविषयीचा नियमच आहे. मी असीम कृपाळू असल्यामुळे तुमच्या मागण्याला काहीच सीमा नसावी.
(माझ्या ‘सीमोल्लंघना’वर देव नाराज आहेत, हे माझ्या लक्षात आले. मात्र माझ्याही मनातला राग अजून काही कमी झाला नव्हता.)
मी बिनधास्त म्हणाले – ” हो, हो आपण असीम कृपाळूच आहात. सुख काय आणि दुःख काय दोन्हीही मुक्तहस्ते असीम वाटता.”
(आता सावध होण्याची वेळ देवाची होती. ते जरा सावरून बसले.)
…. मी आपलं सहजच विषय बदलावा म्हणून त्यांना विचारलं –
“देवा, नवस म्हणजे काय हो?”
देव तत्परतेने उत्तरले –
” माझा वास आहेच हे गृहीत धरून सतत नवीन काहीतरी मागत राहाणे म्हणजे नवस.”
मला आलेलं हसू गालातल्या गालात दाबत मी आपला दुसरा प्रश्न विचारला –
“देवा, पण तुम्ही नवसाला पावता म्हणजे नक्की काय?”
देव : माणसाची इच्छा पूर्ण झाली की मी त्याला पावल्यासारखा वाटतो आणि नाही झाली की त्यांनी मला वाहिलेला नारळ पावल्यासारखा वाटतो.
मी : पण देवा, या नवसाबाबत असे काही नियम आहेत का हो, “अमक्या माणसाने अमक्या देवालाच नवस केला पाहिजे, तमुक भागातील देवालाच नवस केला पाहिजे वगैरे, वगैरे.”
देव : माझ्यातरी असं काही ऐकण्यात नाही बुवा. तुझ्याकडे काही शास्त्रीय माहिती आहे का याबद्दल?
(देवाने माझी दुसऱ्यांदा विकेट घेतली.)
मी : नाही हो, मी आपलं स्वतःला सावरत गडबडीने म्हणाले….पण मग देवा, अमुक देव पावतो, तमूक देवस्थान जागृत आहे ही काय भानगड असते बुवा?
देव : तुझं हे अमूक -तमूक मला काही कळत नाही बघ. “भक्ताच्या मनामध्ये सात्त्विक भाव असेल आणि तो मूक जरी असेल तरीही मी त्याला पावतो, एवढेच मला माहिती आहे.”
( आता मूक होण्याची पाळी माझी होती)
माझी अवस्था पाहून देव म्हणाले, “आपली हरकत नसेल तर येऊ का आता? माझी उपासनेची वेळ झालेली आहे.”
देवही उपासना करतात हे पाहून तर मी अधिकच मूक झाले आणि फक्त मान हलवली.
श्रीकृष्णार्पणमस्तु!


https://share.google/TV2q6VLDAwB6iDecw



यावर आपले मत नोंदवा