वसंतगामी मम हृदयाला भेटे मेघदूत !

कधी कधी तुझ्या अस्वस्थतेची वार्ता | पसरते वाऱ्यावर स्वार होते ढगांवर | येऊन मेघदूत माझा दरवाजा ठोठावतात | जाब विचारायला बाहेर मला बोलावतात अन् सांगतात –
ठेव ना तुझा थोडा ताब्यात कोप
का करतेस वाटेल ते आरोप ?
घे ना गं तू तरी थोडं समजून
किती वर्षे, मी विचारते कळवळून !
वाढतो त्यांचा आवेग, बरसतं पाणी
सांगतात ते मला तुझी लंबी कहाणी
डोळे पुसत विचारते मी, वेडे का रे तुम्ही
खरंच थोडी रागावतो एकमेकांवर आम्ही
कळताच ते अलवार, पुन्हा ढगांवर स्वार
धावत येतात तुझ्याकडे आणि म्हणतात
काहीही झालं तरी तशीच आहे रे ‘ती’
तुला कळतं अगदी पूर्वी जशी होती तशी
वृंदा आशय
ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे !

My child,
Be quiet, peaceful, strong. Nothing is impossible with a quiet strength, the Divine’s Grace and the Mother’s blessings.
With love
The Mother, CWM 18:08
ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे !
मॉं !


देवा, तुझ्या मंदिरात
मज गवसते आकाश
जीवनी नांदो माझ्या
तुझा प्रकाश प्रकाश!
संपूर्ण समर्पण!
•|ॐ|•
मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द. सेवा करायची असेल तर, घड्याळ्यात पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर,चव घेऊ नका सत्संग ऐकायचा असेल तर ,जागा पाहू नका ! विनंती करायची असेल तर,स्वार्थ पाहू नका ! समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला बघू नका. दान करायचे तर ,गरज पाहू नका. व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकते, इच्छेनुसार नाही. यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ती आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तेंव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. कुणालाही न दुखवता जगणे याच्याइतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणी ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहात नाही..!*
श्रीरामकृष्णार्पणमस्तु !

•|ॐ |•
जेंव्हा अमूर्ताला होतो विकार
तेव्हा मूर्ताचे पडतात प्रकार
कधी फांदी, कधी फूलपान
कुठे आकाश कुठे प्रकाश
कधी उजेड कधी अंधार
कधी आधार कधी निराधार!
आम्ही मूर्त ओळखतो जाणतो
अडचण एवढीच अमूर्त विसरतो!
संपूर्ण समर्पण!

दत्तकृपेने स्फुरलेली आरती
•|ॐ |•
पहाटदेवा
जयसूर्यदेवा जयसूर्यदेवा | तू करतोस धवलकृती
तुज मनोभावे मी |ओवाळीते रे आरती ||धृ ||
सृष्टीत तुझ्या नांदती सारे | येतात रात्रीस चंद्र तारे
इथे वाहती पावन वारे |पुत्र त्यांचा मारुती || १||
जयसूर्य देवा जय सूर्य देवा…
निळ्या आकाशी जमती ढग |कधी तुलाही झाकती बघ
देऊन त्यांना सोनेरी किनार |तुझी किरणे उजळून टाकती ||२||
जयसूर्यदेवा जयसूर्यदेवा…
हे सूर्यदेवा हे सूर्यदेवा तुझ्या कृपेने | मनुजसृष्टीत लागो अखंड दिवा | आता तव कृपाकिरणे जी पसरती |मायाजाले गुंते जी दृष्टी ती उजळती ||३||
|
जयसूर्यदेवा जयसूर्यदेवा…
शुभं भवतु!
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!
यावर आपले मत नोंदवा