
भिजली काया, विझली माया ; अंतरी तेवतो ब्रह्मदीप !
श्रीकृष्णार्पणमस्तु !

•| ॐ |•
तिने स्वीकारला प्रकाश
विस्तारले तिचे आकाश
सफल तिचा कृष्णवसा
जपला त्याने ज्ञानवारसा !
संपूर्ण समर्पण! श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
अंतर्मोन
मी कृष्णाची कृष्ण माझा
उगाच का मग गाजावाजा
कृष्ण माझा सखा सोयरा
कृष्ण देई मज नित्यआसरा

कधी होते रे मी कृष्णाची आई
आवर पटकन म्हणत करते घाई
कधी होऊन जाते मी कृष्णाचे वासरू
अन् तोच सांभाळतो माझ्यातले लेकरू
कधी होते रे मी कृष्णाचा सुदामा
जो खेळाया नित्य जाय त्याच्या धामा
कधी होते मी कृष्णवेडी राधा
अर्पुनी त्याला विसरते जीवबाधा
कधी होते मी कृष्णाची सखी
राहते कृष्ण कृष्ण सदा मुखी
कधी होते मी कृष्णाची बासरी
मग प्राण फुंकून तो देई माधुरी
कधी विचारे त्याला सांग ना रे
कृष्णा मी तुझी नक्की कोण?
तूच सर्व काही अन् कोणी नाही
सांगे मजला ते उपजलेले अंतर्मोन
श्रीकृष्णार्पणमस्तु !

संपूर्ण समर्पण! श्रीकृष्णार्पणमस्तु!
यावर आपले मत नोंदवा