वंदे मातरम् ! – संपादक वृंदा आशय

छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी केंद्रावरून अमृतधारा अंतर्गत “देशभक्ती’ या विषयावर प्रसारित झालेले डॉ. शिरीष खेडगीकर यांचे विचार

जन्म – २८ मे १८८३ , मृत्यू – २६ फेब्रुवारी १९६६
मातृभूमिच्या उद्धारा ,
हे हिंदूक्रांतीवीरा !
जी ज्योत पेटवूनी
गेलास पैलतीरा !
धर्मांध सोडू सारा ,
त्यागू स्वार्थ जरा ,
देवू न थारा अविचारा ,
रक्षू राष्ट्र धर्म खरा !
ना विझवू ती ज्वाला ,
आरंभिला जो गोदातीरा !
तो यज्ञ अखंड धगधगता ,
वाढवू वसा देशसेवेचा !
धर्माच्या अभ्युत्थाना
जिवंत संस्कारांना ,
ठेवून , घडवू खांदे
जे कधी न वाकतील
धूरा स्व-देशाची वाहताना !
तव कार्याची पूर्ति ,
हेच गायन शौर्यगाथा !
हाच तूला प्रणाम ,
श्रद्धेने टेकूनी माथा !
गीता गद्रे ( मध्यप्रदेश )
🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रिया आशय जोशी हिचे स्वातंत्र्यवीर सावारकरांविषयीचे भाषण – योद्धा सावरकर
भाषा आणि आपण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धीसाठी प्रयत्न केलेले आहेत. आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण भाषेसाठी काय करू शकतो, ते समजून घेऊ.
भाषा ही आपली आई आहे. आपण तिला ‘मातृभाषा’ म्हणतो. तिला आपण जपायचे. भाषा जपायची म्हणजे काय करायचे? ती व्यवस्थित वापरायची. भाषेच्या नियमांनुसार लेखन करायचे. शब्दांचे उच्चार स्पष्ट करायचे. आपले म्हणणे नम्रतेने मांडायचे. उगाच नाही भांडायचे.
आता गंमत पाहा
१. आबाने आंबा खाल्ला.
( आबा शब्दात ‘आ’ वर अनुस्वार दिला की त्याचा आंबा झाला, काढून टाकला की आबा झाला.)
२. सुशीला आण गं ती शिला.
( शील – चरित्र, शिला – दगड)
(सुशीला – चांगले चरित्र असलेली.
तिचे नाव जर आपण ‘सुशिला’ असे लिहिले तर चांगल्या दगडा इकडे ये असा अर्थ होईल.)
३. तिकडे जाऊन ये.
तिकडे जाऊ नये.
( शब्दांची जागा बदलली की अर्थ पूर्ण बदलतो.)
म्हणून आपण भाषेच्या नियमांचा अभ्यास केला पाहिजे.
वृंदा आशय
यावर आपले मत नोंदवा