•| ॐ |•
नि:संगता हेच सार तत्वत: | – श्रीकृष्णार्पणमस्तु !

काल भेटला पश्चिमेला सूर्य
निरोप देऊन गेला तो आर्य
करू नकोस गं आता चिंता
आहे तू रामजीवनाची संहिता
आज प्रभातकाळी रामवेळी
भेटली त्याची आभा कोवळी
तिची सोज्वळ अस्तित्व तीव्रता
जागवून गेली रामदर्शनाची आर्तता
सारा परिसर बसला होता मख्ख
रामघर मात्र तेथे होत होते लख्ख
झाडत होती तन्मयतेने एक जनी
भरेल आता केर तेथला चक्रपाणी
संपूर्ण समर्पण!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!
•| ॐ |•
•| ॐ |•

भारताचे जीवितकार्य – ४९
दि. २१ फेब्रुवारी १९७१
(श्रीमाताजींनी, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिलेला पुढील संदेश ‘ऑल इंडिया रेडिओ’, पाँडिचेरीवरून प्रसारित करण्यात आला… )
खरी स्वतंत्रता ही कनिष्ठ प्रवृत्तींच्या अधीन होण्यामध्ये नसते; तर ती एक आरोहण करणारी, उन्नत होत जाणारी गती असते. खरी स्वतंत्रता हे दिव्य आविष्करण असते. आपल्याला भारतासाठी खरी स्वतंत्रता हवी आहे; जेणेकरून मानवतेचे भावी स्वरूप काय असले पाहिजे, याचे सुयोग्य उदाहरण भारत जगासमोर ठेवू शकेल.
- श्रीमाताजी (CWM 13 : 370-371)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.
**
India’s Life-Mission – 50
21 February 1971
(Message for broadcast by All India Radio, Pondicherry, on Mother’s birthday…)
True liberty is an ascending movement, not yielding to the lower instincts. True liberty is a divine manifestation. We want the true liberty for India so that she may be the right example for the world as the demonstration of what humanity must become.
-The Mother (CWM 13 : 370-371)
Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.
•|ॐ|•
https://www.facebook.com/share/p/18aHBxQWgV
प्रिय सूर्या,
माझ्या राम वाटेवर
तू भेटलास मला
लिंबासोबतच्या पारंब्यातून
आणि भर माध्यान्हीही
माझं अनवाणी मन
चालत गेलं गारव्यातून
तुझं अंकुरणं, रूजणं
बहरत जाणं आणि राहणं
अनंतहस्ते तू व्यक्त करतो
शक्यता रूजण्याच्या
मग तू मला दिसशीलचना
मुक्तहस्ते आशीष देणारा कृष्ण!
सावित्रीचं वडाला फार मोठं देणं
मला माहीत नाही रे खरंच
तिनं वडाला दिलं की वडानं तिला
पण अजरामर केलं त्यांनी परस्परांना
त्यासाठी सत्यवान मात्र मरणासन्न झाला
सत्याचं नेहमीच असं होतं का रे, सूर्या?
वृंदा आशय
संपूर्ण समर्पण!
यावर आपले मत नोंदवा