योगदिनाच्या पूर्वसंध्येवर
बाल – कुमार गटासाठी विशेष पृष्ठाची सुरुवात
गंमत शब्दांची अर्थ जाणिवांचे !
संपादक – वृंदा आशय
शब्द पुस्तकात असतात आणि त्याचे अर्थ जीवनात वावरतात – विनोबा भावे

संदेश आपल्या मातीचा दृढ आरोग्यनीतीचा !


कळी गं कळी, तुझ्यासारखी माझ्या मुलांच्या चेहेऱ्यावर पसरू दे हास्याची खळी !
हिरवेगार हसावे प्रसन्न दिसावे !
आजचा शब्द
गप्प आणि गप्पा
बाळांनो, शाळा सुरू झाली असेल. मित्र-मैत्रिणींशी खूप गप्पा मारा. तुमच्या बाईंना – ताईंना – मॅडमना – सरांना मनातले प्रश्न बिनधास्तपणे विचारा. उत्तर मिळेपर्यंत गप्प बसू नका.
शोधा म्हणजे सापडेल.
(मुलांनो, बोलोत्सुक शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटले, मला नक्की कळवा. मी वाट बघेल हो.)
अंक अभ्यास



कळ्या आल्या भेटायला तीन, दोन, एक
आई, मला खायला देना गं तू केक !
प्रामाणिकता – अमृतधारा – आकाशवाणी, छत्रपती संभाजीनगर

‘कोतवाल’ हा काळ्या रंगाचा पक्षी आपल्या अवतीभोवती सहज आढळतो. याला काही लोक ‘कोळसा’ असेही म्हणतात. तारेवर अथवा पर्णहिन झाडावर हा पक्षी दिसण्याची शक्यता जास्त असते. हा नकलाकार आहे. इतर काही पक्षांच्या आवाजाची तसेच मांजर, कुत्रा या प्राण्यांच्या आवाजाची नक्कल तो करतो. या पक्ष्याचे शेपूट लांब असते. शेपटीला असलेल्या व्ही आकारामुळे हा सहज ओळखू येतो.
जर काही धोका असेल तर हा आवाज करून सगळ्यांना सावध करतो म्हणून याचे नाव ‘कोतवाल’ आहे.
हा किडे, टोळ, पतंग , भुंगे, खातो. फुलांमधला मध देखील याला आवडतो. शेतात जेव्हा नांगरणी होते तेव्हा नांगराच्या मागे मागे हा फिरतो कारण नांगरताना उडणारे किडे खाद्य म्हणून सहज मिळतात. साधारण संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो.
डॉ. शुभदा राठी – लोहिया, अंबाजोगाई
उद्या १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, तुम्हा सर्व मुलांना या योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
वर्षा विजय देशपांडे, पुणे
या योग दिनाच्या निमित्ताने तुम्ही खालील संस्कृत बालगीतातून विमानची सैर करून या. तुमच्यासाठी ते पाठवले आहे परभणी येथील श्री. दिगंबर पाठक आजोबांनी.
https://www.facebook.com/share/v/1CzNTtu5Uc/ *बालगीतम् – विमानम्* पश्यन्तु सर्वे। 🤩🤩✈️✈️
यावर आपले मत नोंदवा