विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

गुरुकृपा !

वादातून या वाद निर्मितो | नादातून या नाद निर्मितो


•|ॐ|•

मेरे प्यारे कान्हा,

मेरी माता हो आप| मेरे पिता हो आप|
मेरे रक्षक हो आप| मार्गदर्शक हो आप||

मैं चलती तो हूं | किंतु चलाते हो आप|
मैं बोलती तो हूं| पर बुलवाते है आप ||

आपकी कृपा बगैर| कैसी होगी शब्द सैर|
जहां रखूं मैं माथा | वहां हो सिर्फ चैतन्यपैर||

संपूर्ण समर्पण!


गुरुपूजन… गुरुपौर्णिमा विशेष…

गुरु ही संकल्पना नाही. गुरु हे अस्तित्व आहे. जो शब्दांच्या पलीकडे राहून शब्दांना अर्थ देतो, तो गुरु. जो अंधाराच्या आत बसून प्रकाशाची जाणीव करून देतो, तो गुरु. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ उत्सव नसतो, तो एक स्मरण असतो. स्वतःच्या आत डोकावण्याचा दिवस.

आपण अनेकदा गुरु या शब्दाला व्यक्तीशी जोडतो. एक चेहरा, एक नाव, एक रूप. पण गुरुतत्त्व हे रूपाच्या पलीकडचं आहे. गुरु म्हणजे तो बोध जो आतून जागा होतो. गुरु म्हणजे ती जाणीव जी सांगते, हे खरं आहे आणि हे मायेचं जाळं आहे. शरीराने गुरु समोर असो वा नसो, त्याचं तत्त्व सतत कार्यरत असतं. कारण गुरु शिकवत नाही, गुरु घडवतो.

गुरुचरित्रात एक जागा येते जिथे शिष्य विचारतो, गुरुकृपेशिवाय काही शक्य आहे का? आणि उत्तर मिळतं, प्रयत्न आपले, पण फळ त्याच्या इच्छेने. हाच तो भाव आहे जो शरणागतीच्या गाभ्याशी नेतो. अहंकार सांगतो, मी करतो. गुरुतत्त्व सांगतो, मी केवळ माध्यम आहे. या दोन जाणिवा मधला फरक समजला की साधना सोपी होते.

भीती तेव्हाच उरते जेव्हा आपण स्वतःला एकटं समजतो. गुरुतत्त्वाची जाणीव झाली की एकटेपणाची भावना विरघळून जाते. मग वादळ असो वा शांतता, आतला आधार ढळत नाही. …नामस्मरण हा गुरुकृपेकडे नेणारा सोपा मार्ग आहे. नाम घेताना बुद्धी शांत होते, मन स्थिर होते आणि हळूहळू अहंकाराची पकड सैल होत जाते. हे घडण हीच खरी गुरुदीक्षा असते. कुठलाही मोठा विधी लागत नाही, फक्त सातत्य लागत.. रोज थोड, पण न चुकता…

गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी एकच संकल्प ….अहंकार थोडा कमी करायचा आणि समर्पण थोड वाढवायच. बाकी सगळं गुरुतत्त्व स्वतः सांभाळून घेत… ज्याने शरण जायला शिकवल, तोच शरण गेल्यावर हात धरून पुढे नेतो….

॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
ll दत्तरूप ll

#Gurupournima #gurupornima #गुरुपौर्णिमा #shridattarup #dattaguru



•| ॐ |•

चेतनेचे चैतन्य आहे
ते मनाला भावणारे
चेतनेचे चैतन्य आहे
धावत्या मना थांबवणारे
चेतनेचे चैतन्य आहे
ते चित्ताला गवसणारे
चेतनेचे चैतन्य आहे
गाव आतला जागवणारे
चेतनेचे चैतन्य आहे
ते अवघ्या विश्वा व्यापणारे
चेतनेचे चैतन्य आहे
पिंड ब्रह्मांडाला सामावणारे

     श्रीकृष्णार्पणमस्तु!

संदेश वागेश्वरीचा !

वाणी असो अशी लाघवी
वठल्या झाडा फुटो पालवी

सामर्थ्य वाणीचे तू जाण
तो आहे गं रामबाण !

वाणीने स्थापावे ऋत
व्हावे अमृताचे दूत

वाणीने वदावे सत्य
त्यजावे सारे मर्त्य

मधुर असावी वाणी
गावी चैतन्याची गाणी

वाणी असो व्रतस्थ
होवो साऱ्यांची हृदयस्थ !

वृंदा आशय


•| ॐ |•

शब्द स्वयं ब्रह्म है
जो देते हैं ज्ञान
बढ़ाते हैं सन्मान
निगलते अभिमान

शब्दों से
चलाया जाता है
ऐसा अभियान
जो कभी धुंधला
नहीं होने देते
सत्य की राह को
सच कहूं तो
सत्य की चाह को

वह शब्द ही होते हैं
जो हमें ले जाते हैं
उनके परे सीधे ‘परा’ तक
जहां होती है
जिंदगी की नई सुबह
और हम मिलते हैं
अपने आप से
हरदम जिसके साथ होते हुए भी
कभी साथ ना निभाते थे
वजह अलग-अलग थी
किंतु यह सच है
अपने आप से
कभी मुलाकात ना हुई थी

शुक्रगुजार हूं मैं उन शब्दों की
जिन्होंने मुझे ‘हम’ दे दिये
‘अहम्’ को मिटा के!

कभी ना बुझे संघटन का ये दीपक
प्रभू, बस यही प्रार्थना!

संपूर्ण समर्पण!
श्रीकृष्णार्पणमस्तु!



https://forms.gle/SBBNreVgnoyoP7KH8

वरील गुगल फॉर्मच्या लिंकवरून आपण शोध स्वत:चा – शिक्षकाचा, शिक्षणाचा ! या कार्यशाळेसाठी नाव नोंदणी करू शकता



प्रतिक्रिया व्यक्त करा