ही वाट दूर जाते !

•| ॐ |•
माँ – बेटी
बेटी : माँ, ज्ञान अच्छा होता है या अज्ञान?
माँ: मेरी बेटी ऐसा गलत सवाल कब से पूछने लगी है?
बेटी : क्षमा करो माँ! किंतु सभी लोग व्यवहार में कहते हैं ‘अज्ञान में आनंद होता है’ |
माँ : तो तुम भी वही सोचने लगी?
बेटी : नहीं माँ! आप स्वयं ज्ञान की देवता है| और मैं तो निरंतर आपकी उपासना करना चाहती हूं|
माँ: अच्छी बात है बेटी| आपका हृदय ही आपको सही रास्ता दिखाता है इसलिए कभी भटक मत जाना|
बेटी : माँ और एक प्रश्न है मन में|
माँ : पूछो बेटी|
बेटी : ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, आत्मज्ञान यह सब अलग-अलग होते हैं या एक ही होते हैं मॉं ?
माँ : यह सब ज्ञान की विभिन्न शाखाएं हैं बेटी |
बेटी : मॉं, मैंने पढ़ा था कोई भी शास्त्र या कोई भी कला आपको एक ही सत्य के और ले जाती है |
मॉं : बिल्कुल सही पढ़ा था आपने|
बेटी : किंतु माँ हमें लगता है कि सत्य की भी अलग-अलग संभावनाएं होती है, यह सच है या झूठ है मॉं?
माँ : बड़ा अच्छा प्रश्न है बेटी | जब तक आप अपने अभ्यास के द्वारा किसी एक निर्णायक सच तक पहुंच नहीं जाते तब तक आपको यह सारी संभावनाएं मन में रखना बहुत जरूरी है| किंतु जैसे-जैसे आपका अभ्यास बढ़ता जाता है आप स्वयं एक सच तक पहुंचते हो, वह सच आपके हृदय में प्रकाशित हो उठता है ; उसके बाद अन्य संभावनाएं अपने आप खत्म हो जाती है|
बेटी : तो माँ मैंने बचपन में स्वामी विवेकानंदजी के शिक्षा के विचार पढ़ते हुए यह पढ़ा था कि, “शिक्षा नकारात्मक कार्य करती है, क्योंकि जो अयोग्य है उसे वह पूरी तरह से निकाल देती है ; फिर जो ज्ञान आपके अंदर होता है, जो वहां पहले से ही उपस्थित होता है सिर्फ धूल की मतलब विकारों के हटने की वजह से वह ज्ञान स्वयं प्रकाशित हो जाता है”, तो क्या यही सच है माँ?
माँ : शत प्रतिशत मेरी बच्ची| कितना अच्छा लग रहा है हमें ,आपसे यह सब सुनते हुए|
बेटी : मुझे भी बड़ा आनंद आ रहा है माँ |
माँ : विवेक जगने के बाद आनंद का ही प्रकटन होता है बेटा |
बेटी :माँ हमें श्री रामकृष्ण परमहंस जी की शिक्षा बड़ा आनंद देती रहती है, तो हम उसे पर चलते रहे क्या माँ?
माँ : हां बेटी, अवश्य | तुम्हें पता है ना उन्होंने क्या कहा था?
बेटी : हां माँ ‘जो राम था, जो कृष्ण था ; वही ‘रामकृष्ण’ बनकर आया है, ऐसा कहा था माँ उन्होंने |
माँ : बिल्कुल सही बात है बेटा | वह आपके परात्पर गुरु है, उनकी बात आप कभी भी ना टालना |
बेटी : जो आज्ञा, मेरी प्रिय माँ | हम पुन: अपने आप को, आपसे संपूर्ण समर्पित करते हैं माँ|
माँ : कल्याण हो बेटी |
हम तो बस माँ से प्रार्थना करते रहे, “ऐसीमाँ बेटी हर घर पैदा हो जाए, तो कितना उज्जवल होगा मेरी भारत माँ का रूप” |
संपूर्ण समर्पण माँ!
•| ॐ |•
देवा,
तुझा मी कुंभार
देई घटाला आकार
घट राहू पाहे निराकार
तूच करना रे साकार !
श्री माँ, श्रीकृष्णार्पणमस्तु!
•| ॐ |•
मज पुसे धाकटी
का गं एकटी ?
मी पुसे कुठे? कोण?
मजसवे राहते मौन!
मौनासवे मी जाते अंतरी
प्रवासते गं तिथे निरंतरी
असते की मी माझ्या सोबत
येईल कशी कोणती नौबत?
तुला सांगते तेच देऊळ
दर्शवते जे नि:शंक स्वमूळ
उपटून काढते सारे समूळ
अन् जन्म देते नवा निर्मूळ !
संपूर्ण समर्पण श्री माँ !
•| ॐ |•
शब्द भेळ
टक – नाटक – काटक – फाटक
कालच मैत्रीदिन झाला. माझी प्रामाणिक मैत्री आहे ती शब्दांशी. त्यांनी माझ्या आयुष्याचा प्रवास सुंदर केलेला आहे. मौनाच्याही पलीकडे नेऊन ब्रह्माचं दार दाखवलेलं आहे. या दाराकडे ‘टक’ लावून पाहात असताना वरची शब्द भेळ माझ्या मनामध्ये प्रकटली. ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथे आलेली आहे.
खरं म्हणजे या शब्द भेळीला मला सुचणारा पर्यायी शब्द म्हणजे ‘कृष्णकाला’! हा शब्द आठवल्या बरोबर ‘काल्याचा’ प्रसाद आठवतो. ती स्नेहार्द्र पवित्रता मनामध्ये दाटते. मात्र कृष्णाला आठवून मनाची कालवाकालव होते. त्यामुळे ‘शब्द भेळ’ हाच शब्द वापरावा या निर्णयापर्यंत मी पोहोचलेली आहे.
तर सांगायचा मुद्दा असा ब्रह्मद्वाराचं महात्म्य पाहा. त्याच्याकडे नुसतं ‘टक’ लावून पाहिलं तर त्यानं मनातून ‘नाटक’ वजा करून टाकलं. नाटक ही आपल्याला एक दृकश्राव्य कला म्हणून माहीत आहे. नाटकामध्ये काम करणाऱ्या पात्राची आपण रंगमंचावरचे कलाकार आहोत ; ही जाणीव पूर्णपणे जागृत असते. ब्रह्मद्वार आपल्यासाठी जगालाच रंगमंच करून टाकतो. विकसित करतो एक सुंदर जाणीव आपण ‘पाहुणा कलाकार’ असल्याची. पाहुणा म्हणून स्वतःकडे पाहायला लागल्यावर केवळ दृष्टीच नाही सारी सृष्टी बदलून जाते. सगळ्यात पहिल्यांदा संपुष्टात येते ती हक्काची भावना! हक्कापाठोपाठ मनामध्ये कर्तव्य जागे होतात. कर्तव्याची भावना संपुष्टात येत नाही, हे या भूमिकेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. उलट ही कर्तव्ये आपण पाहुण्याच्या सभ्यतेने पार पाडायला लागतो. आपण इथे काही दिवसच आहोत तर कशाला उगाचच आपलं म्हणणं मांडायचं? आपल्या मतांचा आग्रह धरायचा? त्यापेक्षा ‘अलिप्त’ राहावं आणि मुक्त व्हावं ; ही भावना मनात जन्म घेते. या अलिप्ततेतला आनंद इतका सुरेख असतो की सगळी भ्रांत मिटवून तो मनाला शांत करतो. या शांततेशी एकरूप होत आपण आपला प्रांत निर्माण करतो. आपला प्रांत असं म्हणतानाही इथे मालकी हक्काचा प्रश्न निर्माण होत नाही, कारण इथे आपल्याशिवाय कोणीच नसतं. मग उगाचच कुणावर तरी हक्क गाजवा, यापेक्षा आपल्यामध्ये जे ब्रह्मतत्त्व लपलेले आहे त्याला जागवा या मतापर्यंत आपण आपसूक पोहोचलेलो असतो.
हा प्रवास सोपा निश्चितच नसतो. इथे परीक्षा होते आपल्या ‘काटक’ असण्याची. या प्रवासामध्ये मागे सोडायचे असतात आपले सारे पूर्वग्रह आणि ओलांडायच्या असतात ‘स्व’ च्या सीमारेषा ! आपल्याविरुद्ध आपले कटक (सैन्य) वापरावे लागते. या प्रवासाचे वैशिष्ट्य असे, आपण आपल्या विरुद्ध लढणे ही इथे प्रतारणा नसते, त्यामुळे आपण कधीच पराभूत होत नाहीत. अस्वस्थतेकडून – स्वस्थतेकडे नेणारा (स्वस्थ – स्वतःमध्ये स्थित होणे) असतो हा प्रवास. या प्रवासामध्ये आपण इतके ‘स्व – भूत’ होतो की
‘जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत’ या संत ज्ञानदेवांनी सांगितलेल्या एका थांब्यापर्यंत आपण येऊन पोहोचतो. ही ‘भगवंतपणा’ची भावना इतकी विकसित होते की कोणाकडूनही काहीही मिळालं किंवा नाही मिळालं तरी आपण स्वतःला भाग्यवंत मानायला लागतो. हे तृप्त समाधान असतं.
त्यामुळेच उघडलेले ‘फाटक’ आपण सताड उघडे राहू देतो. आपण बेफिकीर असतो असं नव्हे तर कोणत्याच प्रकारची असुरक्षितता आपल्या मनात निर्माण होत नाही, त्यामुळे आपण कोणाच्या आश्रयाला जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आपण जगतो निर्भय सभ्यतेने ! ही निर्भयता मनामध्ये कोणतीही आढ्यता निर्माण करत नाही, कारण तिथे ‘स्व’ विलीन झालेला असतो. ही फक्त सुरुवात असते ‘स्व’ ला विकसित करण्याची !
श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
तू येतोस कुठूनही
मला जड झाले की
पण सोडत नाहीस बोट
खरं म्हणजे
येऊ देत नाहीस खोट
तुझ्या – माझ्या
न दिल्या – घेतलेल्या वचनाला !
का जागतोस एवढा ?
तू देव आहेस म्हणून
की मी माणूस राहावं म्हणून?
श्रीकृष्णार्पणमस्तु!
प्रतिक्रिया व्यक्त करा