विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

मां

जीवन स्वाभाविक होता है |

मैंने पूछा मॉं से ज्ञान के लिए प्रयास लगते हैं, वह बोली ; नहीं| ! सिर्फ सच्ची प्यास लगती है|




•| ॐ |•

प्रिय कृष्णा,

तू इतका प्रिय आहेस मला
की दाखवतोस साऱ्या बाळलीला
खूप तन्मयतेने वाचायचे रे मी त्या,
कौतुकही करायचे त्या कल्पिताचं
तीन वेळा ‘हरिविजय’ वाचणं म्हणजे गरोदरपणी सुखाने माझ्यात नांदणं!

मज्जा वाटायची मला,
तुझ्या जन्मानंतर
साऱ्या वस्तू उठतात
आणि तुला मारायला आलेल्या राक्षसाचं आयुष्य लुटतात !

याच धरतीवर
‘बेबीज डे आऊट’
हा सुद्धा मन लावून पाहिला मी,
त्या परदेशी बाळाच्या जागी
माझ्या संस्कृतीतला बाळकृष्ण बघत !

तशी मी लहान होते तेव्हा वयाने
पण तू शहाणं केलंस अनुभवाने !
तुझ्याजवळ येताच
भान आलं वास्तवाचं
गळून पडली समजूत
आणि कळलं तुझ्या बाळलीळा
हे तर चित्रण वास्तवाचं!

आता तू दाखवतो मला,
जेव्हा मांगल्याला नासवलं जातं
आणि माणसांना नाचवलं जातं
तेव्हा कुलूप किल्ली बोलू लागतात
त्यांच्या आधुनिक
डिजिटल स्वरूपात सुद्धा !

कशी गंमत असते बघ,
माणसाचं तोंड कुलूपबंद
मग वस्तूंनाच बोलण्याचा
लागतो छंद
जेव्हा अंतिम टप्प्यात येतो
नाश मांगल्याचा
सा-या सृष्टीलाच तेव्हा फुटते वाचा !

तुला म्हणून सांगते कृष्णा,
हे पण कळले रे मला
बालपणीच्या परिकथांमध्ये असायचे बघ सात पर्वत, सात समुद्र, आणि असं बरंच काही…
आत्ता आत्ता कळलं रे
स्वतःचे सात स्तर ओलांडून
ते असतं स्वतःलाच भेटणं !
………………………………………
गंमत असते बघ
आम्ही व्याकुळ होतो
तुझ्या भेटीसाठी
कुठे कुठे जातो? काय काय करतो?
शेवटी थकून भागून
हळूच कोमल मनाने
आम्ही आमच्यात उतरलो
खोल खोल
की ऐकू येऊ लागतात
कृष्णबोल !

तू गोड हसतोस
आणि बासरी वाजवतोस
आम्हाला वाटतं
तू आमच्यावर प्रेम करतोस
तसं काही नसतं रे
कारण तू तसाच असतोस
अनादी काळापासून
अनंत काळासाठी!

या काळाच्या प्रवाहातला
एक सार्थक थेंब होण्याचं
तू भाग्य देतोस वाट्याला
होतो आम्ही भाग्यवंत
बोलतो आमच्याशी
भगवंत म्हणून !
खूप बरं वाटतं रे, भारतीय असल्याचं !

           श्रीकृष्णार्पणमस्तु!

मैं कृतज्ञ हूं आप सभी की|

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!

संपूर्ण समर्पण मां |


प्रतिक्रिया व्यक्त करा