कोणत्याही अटीशिवाय झालेले सर्जन हे अंतिमत: विसर्जनाकडे नेते.
१७ सप्टेंबरच्या निमित्ताने – वृंदा आशय
•| ॐ |•
श्री मॉं!
शब्दवेध
‘स्वतंत्र’ आणि ‘स्वातंत्र्य’
उद्या १७ सप्टेंबर म्हणजे ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ आहे. स्वाभाविकपणे आजपासून सगळ्या आठवणी मनामध्ये जाग्या व्हायला लागतात. त्या सगळ्यांना बाजूला ठेवून काहीतरी लिहावंसं वाटतं आहे. वरील दोन शब्द मनामध्ये त्याच संदर्भात खेळत आहेत. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असते ‘स्वतंत्र’ आणि ‘स्वातंत्र्य’ हे दोन निराळे शब्द आहेत. त्यांचा योग्य ठिकाणी योग्य उपयोग, सजगतेने करता आला पाहिजे.
व्याकरणामध्ये शब्दासाठी ‘पद’ ही संज्ञा वापरली जाते. शब्द वाक्यामध्ये काय कार्य करतो त्यावरून ‘शब्दाची जात’ निश्चित केली जाते. कोणत्याही वाक्याशिवाय जेव्हा ‘स्वतंत्र’ आणि ‘स्वातंत्र्य’ या दोन शब्दांना आपण आपल्यासमोर ठेवतो त्या वेळेला आपल्याला लक्षात येते की व्याकरणिकदृष्ट्या ‘स्वतंत्र’ हे ‘विशेषण’ आहे आणि ‘स्वातंत्र्य’ हे ‘भाववाचक नाम’ आहे. ‘स्वतंत्र’ हे विशेषण ज्याच्या संदर्भात वापरले जाते, त्याची स्थिती दाखवते तर ‘स्वातंत्र्य’ हे भाववाचक नाम शस्थितीच्या म्हणजेच ‘स्वतंत्र असण्याच्या’ हक्कासंबंधी, अधिकारासंबंधी बोलणारे आहे. त्यामुळे माझे विद्यार्थी जेव्हा बोलता बोलता ‘१९४७ साली भारत स्वातंत्र्य झाला’ असा वाक्प्रयोग करतात ; तेव्हा त्यांना उदाहरणाने समजवावे लागते. ‘१९४७ साली भारत ‘स्वतंत्र’ झाला ; तेव्हापासून ‘स्वातंत्र्य’ हा आपल्याला मिळालेला हक्क आहे.’ शब्द आणि अर्थाच्या साहचर्यभावाने आमची आपसूकच ‘स्वातंत्र्य-स्वैराचार’ ; ‘हक्क – कर्तव्य’ याबद्दल चर्चा होत असते. त्या चर्चेचा साधारण सारांश असा असतो, “स्वैराचार टाळून कर्तव्यांची जोपासना केली की हक्क आपसूकपणे प्राप्त होतात.”
स्वातंत्र्याबरोबर पारतंत्र्याचा विचार आपसूकपणे होतो. तो केवळ विरुद्ध शब्द किंवा विरूद्ध स्थिती म्हणून नव्हे तर ; भारताची वस्तुस्थिती म्हणून होतो. ‘स्वतंत्र’ आणि ‘स्वातंत्र्य’ या शब्दांचा उगाचच विचार करताना देखील मला असे नेहमी वाटते ‘परतंत्रता’ जिथे असते तिथे ‘स्वातंत्र्याची आस’ निर्माण होते ; आणि त्यानंतर ‘स्वतंत्रता’ ही वस्तुस्थिती होते. त्यामुळे मला ‘स्वातंत्र्य’ हा भाव खूप महत्त्वाचा वाटतो. मग आपसूकच महात्मा गांधी मला आठवतात – , “तुम्ही स्वतःला स्वतंत्र माना – तुम्ही स्वतंत्र होताल” हा माणसाला ‘आत्मस्वातंत्र्या’च्या दिशेने नेणारा महामंत्र आहे. हा ‘महामंत्र’ म्हणून जेव्हा मला स्मरतो तेव्हा आपसूकच मला ‘श्रीमद् भगवद्गीता’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘गीता रहस्य’, ‘गीतेवरील निबंध’ आणि या ग्रंथांचे कर्ते या सगळ्यांचे स्मरण होते. खूप बरं वाटतं मला. यांचे ‘स्मरण’ विस्मरणात गेले तर ‘मरण’ आहे हे फार प्रकर्षाने जाणवते मला. १७ सप्टेंबर बाबत वापरला जाणारा ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ या शब्दातील मुक्तीचा फार वेगळा अर्थ माझ्यापर्यंत त्यानिमित्ताने पोहोचतो. त्यामुळे ‘भारतीय संस्कृती’बद्दल विद्यार्थ्यांशी नेहमीच बोलले गेले पाहिजे ; हे मला माझे केवळ शैक्षणिक कर्तव्य नव्हे तर सर्वकालातीत अशी मूलभूत गरज वाटते. आपली मूळं मुलांना कळली नाहीत तर ती फुलणार कशी?
आपल्या अपेक्षा तर फार मोठ्या मोठ्या आहेत. आपल्याला वाटते शिक्षणाने विद्यार्थ्यांना वटवृक्षासारखे मोठे केले पाहिजे. त्यांनी एवढी अफाट मेहनत घेतली पाहिजे की ‘कल्पतरू’ होण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये विकसित झाले पाहिजे. मला या अपेक्षा कधीच चुकीच्या वाटत नाहीत, कारण भारतीय संस्कृती आपल्याला हेच शिकवते. स्वतःला खोदत संस्कृतीची पाळंमूळं गवसायला लागली की हे सगळं उलगडायला लागते. तिथे प्रयत्नाने कल्पतरू असतो, कल्पनेने कल्पतरू नव्हे. त्यामुळेच तर, ‘असेल हरी तर देईल खाटेवरी’ या विचारसरणीला भारतीय संस्कृती स्पष्ट नकार देते. तोंडापर्यंत आलेले जांभूळ आत कोण ढकलेल ; या विचाराने जो इतरांची वाट पाहत बसतो तो कायम उपाशीच राहणार. या आशयाची सांगितलेली गोष्ट आम्ही ‘आळशी माणसाची गोष्ट’ म्हणून ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ या संतवचनावर भारतीयांची नितांत श्रद्धा आहे. संतांनी हाती ‘टाळ’ देऊन ‘कर्म टाळण्याचा नव्हे’ तर ‘कर्म साजरं करण्याचा’ विचार दिलेला आहे. तो स्वीकारता आला पाहिजे. ‘कर्मे इशू भजावा’ हे ज्याला कळते तो आजन्म ‘स्वतंत्र’ राहण्याचे ‘स्वातंत्र्य’ खऱ्या अर्थाने उपभोगतो.
श्रीकृष्णार्पणमस्तु!
संपूर्ण समर्पण मॉं!
•| ॐ |•
श्री मां
सुन लो कान्हा…

सुन लो कान्हा
अब हमारा घुटना
फिर ना बनाना
अपना खिलौना |
कुछ भी क्या सखी
क्या हम खेलेंगे
आपको सताएंगे
कैसे हो सकता है
यह आप सोचेंगे ?
पूछा था हमने
अपनी मां से
कह दिया उसने
कभी शब्द से
कभी मौन से |

मां ने कह दिया
और आप भी मान गए
यह भी कोई बात हुई
क्या यह आपके
कान्हा की साथ हुई ?
नहीं जानते नहीं समझते
हम कुछ ज्यादा इस बारे में
बस एक ही है जानते
नहीं कभी अपने मां पर
अविश्वास है कर सकते |
मां पर अविश्वास नहीं
तो कान्हा पर शक क्यों सखी?
शक नहीं है यह हमारा कान्हा
यह तो है हमारी मां का कहना
कहती है हां मां मेरी, तंत्रविद्या
में अटक गई है साथ तेरी,
खींच के लाना उसे वहां से
कह देना फिर सारे जहां से….
क्या है कहना क्या है मानना
हम कुछ भी नहीं समझे सखी
सुन लो कान्हा
होता है अंतर
समझ लेने में
और मानने में
… बस इतना ही कहा था हमसे मां ने
फस रही हो सखी आप
वह नहीं आपकी मां
खुलकर कहो ना कान्हा
फिर कहना चाहते हो क्या?
…………………………………
यही तो दुविधा है सखी
नहीं हूं कह सकता और
नहीं हूं कर सकता
भूल जाओ आप
हमारा अता-पता
इसी में भलाई है सबकी |
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!
संपूर्ण समर्पण मॉं!
•| ॐ |•
श्री मॉं!

पुरात पूर
दुरात दूर
ऊरात उर
भरगच्च होऊन
रिते उर !
श्रीकृष्णार्पणमस्तु!
संपूर्ण समर्पण मॉं!
प्रतिक्रिया व्यक्त करा