गुरुतत्त्व निरंतर प्रकट होत असते, गुरुकृपेने ते अंत:करणात उलगडत असते. माय माऊलीच्या कृपेने ते प्रस्फुटीत होत असते. कृतज्ञ वंदन त्या गुरूपरंपरेला ! – वृंदा आशय
•|ॐ |•
येऊ घातलेल्या सर्व सणांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उत्सवी मन:शांतीसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून पासून पुन्हा एकदा सोशल मीडियाचा एक आठवड्यासाठी निरोप घेत आहे.
परमेश्वरचरणी सर्वांच्या सुख कल्याणासाठी विनम्र प्रार्थना! शुभं भवतु !
श्रीकृष्णार्पणमस्तु!
संपूर्ण समर्पण मॉं!
संपूर्ण समर्पण मॉं!
माझ्या सासरचे कै. विनायानंद आजोबा (बालू मामा ) यांनी स्वत: रचलेले व सादर केलेले गुरुकृपेवरचे एक गीत
•| ॐ |•
श्री मॉं!
ओ मेरी प्यारी प्यारी बारिश
आप तो महसूस होती हो ‘ईश’
कहते हैं पानी को जीवन
बिन आपके कैसा होगा सृजन
जब हर एक कोई बन जाता है
सूरज का साजन
तभी हो सकता है
नया भजन पूजन विसर्जन
और सृजन !
संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!
दि. १२ सप्टेंबर २०१८ रोजी वेदान्तश्री या दिवाळी अंकासाठी लिहिलेला लेख – गुरुगीतेतील संदेश !
गुरुवर्य कै. डॉ. ल. का. मोहरीर सरांच्या आदेशाने व मिळालेल्या अभ्यास प्रेरणेने लिहिलेला लेख. पुन्हा एकदा कृतज्ञतेने गुरुचरणी समर्पित !
•| ॐ |•
श्री मॉं!
शब्दवेध
‘हस्त’ – ‘हात’
वरचे दोन शब्द वाचले की व्याकरणदृष्ट्या आपल्याला लगेच लक्षात येते की ही ‘तत्सम आणि तद्भव’ या शब्दांची जोडी आहे. ‘हस्त’ हा संस्कृत भाषेतील मराठी भाषेमध्ये जसाच्या तसा वापरला जाणारा ‘तत्सम शब्द’ तर ‘हात’ हा त्यापासून निर्माण झालेला मराठी शब्द म्हणून आपण त्याकडे पाहतो.
आपला ‘हात’ आपल्याला अक्षरशः पाहता येतो हे मोठं छान वाटतं मला. ‘हात पाहणे’ याचा ज्योतिष शास्त्राच्या अनुषंगाने एक अर्थ आपण ‘भविष्य पाहणे’ असा घेतो. मी मात्र मराठी साहित्याची विद्यार्थिनी असल्यामुळे मला माझ्या बहिणाबाई अधिक आठवतात –
लपे करमाची रेखा | Lape Karmachi Rekha | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online https://share.google/pcvAJhTwDQ1SxNVKF
वैधव्याने खचून न जाता आयुष्यात स्वकर्तृत्वाने उभे राहण्याचा जो निर्णय बहिणाबाईनी घेतला आणि अक्षरश: जगला, तो आपल्याला आजही थक्क करतो. आत्मबळाचे हे प्रकटीकरण थक्क करणारे आहे.
नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू । धनरेषांच्या चऱ्यांनी, तळहात रे फाटला, देवा तुझ्याबी घरचा, झरा धनाचा आटला ॥
नको नको ज्योतिषा, मला नको सांगू गूज, माझ्या कपाळाचा लेखा, मले ठावा आहे रे तूज । कष्टाचे रगत वाहे, माझ्या नसा नसांतून, धन-संपत्तीचा शोध, नको घेऊ हातांतून ॥
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या, बापा नको मारू थापा, अशा उगा खऱ्या-खोट्या । माझे दैव माझ्या कष्टांत, माझ्या घामाच्या थेंबांत, नको पाहू तू रेषा, माझा हात नको पाहू ॥
नको नको ज्योतिषा – मराठी कविता (बहिणाबाई चौधरी) https://share.google/akILnJliyYVmVOXyS
https://share.google/akILnJliyYVmVOXyS
अगदी स्वाभाविकपणे मी ‘हात’ याचा अर्थ ‘हातावरच्या रेषा’ यापेक्षा ‘हातामधली कर्तृत्वशक्ती’ असाच घेते. मग ‘हात पाहता येतो’ याचा अर्थ माझ्यासाठी तरी ‘आपली कर्म आपल्याला पाहता येतात’ ही अर्थश्रृंखला माझ्या मनामध्ये उलगडत राहते. माझी भारतीय संस्कृतीवर आणि या संस्कृतीने जीवनाला दिलेल्या तत्त्वज्ञानावर नितांत श्रद्धा आहे त्यामुळे ‘हात’ या शब्दाच्या त्या पाठोपाठ मला आठवतात पहाटेचे श्लोक –
“कराग्रे वसते लक्ष्मी:, करमध्ये सरस्वती| करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम्||”
आणि त्या पाठोपाठ आठवतं उगवत्या सूर्याचं दर्शन घडवणार विशाल आकाश जे सांगत असतं –
“आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति॥ “
त्यामुळे हाताने केलेले कर्म आणि हे कर्म प्रत्यक्षात करण्यापूर्वी ते करण्याबद्दल मनाच्या अत्यंत सूक्ष्म स्तरावर त्याबाबतची निर्माण झालेली जाणीव, कल्पना, विचार आणि अनुभव या साऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष कर्मासह ‘श्रीकृष्णार्पणमस्तु’ करण्यावर माझी नितांत श्रद्धा आहे; ती केवळ माझ्या भारत मातेमुळे. ही माय माऊली आठवली की माझे प्रत्येक कर्म आणि त्या भोवतीचा सर्व परिसर प्रश्न विचारतो,
” तू जे काही करती आहे ते ‘राष्ट्रहितकारक’ आहे का?”
या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक आले की ते कर्म निश्चितपणे करायचे असा निश्चिंतपणे निर्णय घेतला जातो आणि पाठोपाठ कृती होत राहते ; फळाची चिंता त्याला !
‘चिता चिंता समाप्रोक्ता बिंदूमात्रं विशेषता…’
हे मनावर ठसलेले असल्यामुळे
‘चिंता छोड़ कर चिंतन
चर्चा छोड़ कर आचरण’
हे श्रीमद्भगवद्गीतेच्या आधारे सांगणारे विनोबा भावे माझ्यामागे उभे असतात. विनोबाजींच्या पाठीमागे असतात उभे ‘महात्मा गांधी’ मानवतेच्या प्रेमाचा विशाल अर्थ व्यक्त करणारी मूर्तीमंत मूर्ती – राष्ट्रपिता म्हणून ! आपसूकच नतमस्तक होते मी या सर्व संस्कारांपुढे. हातात काठी घेऊन वेगाने पुढे चालणारे पाय, हाताला चरख्याची मिळणारी चक्रीय गती आणि मनामध्ये अखंड ज्ञानयुक्त भक्तीतून निर्माण झालेली नीती हा असतो माझ्या संस्कृतीचा अखंड प्रवाह आणि मी त्यातला एक तृप्त बिंदू !
संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!
संपूर्ण समर्पण मॉं!
जीवन ही एक अंतर्यात्रा आहे. त्या अंतर्यात्रेसाठी हार्दिक शुभेच्छा !
प्रतिक्रिया व्यक्त करा