जाता जाता भालचंद्र वदे
ज्याचे जीवन सरळ साधे त्याला पावती राधे राधे !


•| ॐ |•
श्री मॉं!
पुसे कोणी
बुद्धीची देवता गणपती
देईल कसे ज्ञान ती वाणी?
सांगा बरे
काय म्हणजे ज्ञान?
वर्तमानाचे भान!
गणपतीच्या आरतीतील
काही शब्द उमटती
काही लोपती!
त्या रित्या जागेत
येऊन गणपती
म्हणे….
बाई हो जाणती!
आज बाप्पाचा अखेरचा दिवस
आपसूक होतो त्याचा जयघोष
कोणती घोषणा कोठे उमटे
त्यावर ठरे गणपती केव्हा उठे ?
संपूर्ण समर्पण माय-माऊली!
जेथ जेथ जाय दृष्टी
तेथ तेथ नारायण
करिते सारी सृष्टी
माझ्या सुखाचे पारायण!
संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!
•| ॐ |•
श्री मॉं!
निरोप गणरायांना!
||ॐ गं गणपतये नमः||
खूप वाट पाहिली आम्ही
सोंडेत पाऊस अडकेल
म्हणून ! पण तू मोकळा झालास
स्वतःपुरतं सडा शिंपण करून घेऊन!
शेवटी कसं असतं ना
माणूस आशावादीच
सोंडेत अडकेल, माळेत अडकेल
म्हणून वाट पाहत राहतो
तुझ्या कृपेची
जाणीवही असते मनात
त्याला स्वतःच्या कृतीची !
करतो कोणी, चुकतो कोणी
अन् मुकतो दुसराच कोणी
कदाचित यालाच ‘नियती’ असे
नाव दिलेले असावे तुम्ही देवांनी
शेवटी स्वीकारावं लागतंच
प्रखर वास्तव १९७२ पेक्षाही अधिक
कडक दुष्काळ असल्याचं
रडत पडत आम्ही पुन्हा
तुझ्याचकडे येतो
सरू दे दुष्काळ होऊ दे सुकाळ !
या प्रार्थनेच्या निमित्ताने –
तुझ्याकडे पुन्हा पुन्हा येण्यात
काहीच वाटत नाही आम्हाला
कारण ठाम श्रद्धा आहे आमची
‘सर्व मंगल मांगल्ये’ चा श्रीगणेशा
तूच आहेस रे पार्वतीच्या हे मुला !
फक्त कधी कधी प्रश्न पडतो
हिला आमची श्रद्धा म्हणावं
अगतिकता म्हणावं
की तू घेतलेली
आमची कठोर परीक्षा ?
…. काहीही असलं तरी तुझ्या कृपाळूपणाबाबत आम्ही
निःशंक होतो, आहोत आणि राहूत !
तुझ्या येण्या-जाण्यात
स्वागत अन् निरोपाची
आमच्या ओठी गाणी
सोबतीला असतंच की रे पाणी
कधी आकाशातून कधी डोळ्यातून!
चुकलं-मुकलं माफ कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये रे बाप्पा!
||ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
श्रीकृष्णार्पणमस्तु!
संपूर्ण समर्पण मॉं!
•|ॐ|•
श्री मॉं!
https://share.google/ZZjP44kEK7TUvUzuD
तो निघून जाताना
मागत होता साथ
मी दिली बिनधास्त
मग तो अखंड
राहिला गात
कदाचित पुढचा मार्ग
दाखवण्यासाठी
तेव्हाच मला केलं होतं मौन
ते अनुसरताच …
…………………………….
हे सारं कळताच
मी अत्यानंदी झाले
माझ्या त्या काळासाठी
ज्यानं माझं जगणं केलं होतं असह्य
कारण त्यामध्येच होती बीजे –
बकुळ वृक्षाची माहिती – https://youtu.be/9UHLtrj1MCg?si=_CFnfEBKs4etveNx
•| ॐ |•
श्री मॉं!
मागणं सृष्टीला!
बाळ निजला निजला
सुख देई त्याला वारा
नको आणू रे सूर्या
तुझ्या किरणांचा पसारा
बाळ जेव्हा जागेल
सुख तुला मागेल
फुलव रे तू तेव्हा
तुझ्या किरणांचा पिसारा!
संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!
प्रतिक्रिया व्यक्त करा