विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

कृष्णं वंदे जगद्गुरूम् !

•|ॐ|•

श्री मॉं!

मैं देखूं कहीं से भी तो
लगती सुंदर राधा है
हॉं राधे तेरा
अपने आप से
कुछ वादा है
ना कुछ भी कम
ना कुछ जादा है
यह तो बस मां ने
आपको दिया हुआ इरादा है
…………………………

कैसे कोई समझे इसे
राधा को कृष्ण दिखे कैसे
आंख में आंख डाले तो
होता है मिलन स्वयंसे !

राधे राधे! राधे राधे!
संपूर्ण समर्पण मॉं!

अवधूतचिंतन श्रीकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•

श्री मॉं!

                                                     दि. २७ ऑगस्ट २०२६

मातृ संदेश

‘सजन’ म्हणजे जनांसहित. ‘सजन’साठीची सूचना ‘सज्जनत्वा’कडे नेते. त्यातून जन ‘सुसज्ज’ होतात. नव्या जगाच्या अवतरणासाठी सामान्य जन संघटित व सुरक्षित होणे ही काळाची गरज आहे.

अवधूतचिंतन श्रीकृष्णार्पणमस्तु!

                                                संपूर्ण समर्पण मॉं!

कृष्ण खंत

देव प्रत्यक्षात समोर असला तरीही जोपर्यंत तो चमत्कार दाखवत नाही, तोपर्यंत भारतीय माणूस त्याला ‘देव’ म्हणून स्वीकारू शकत नाही. आम्ही प्रगत झालो म्हणजे नक्की काय झालो?प्रगतीची, विकासाची व्याख्या मला कोणी सांगेल का?

संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•
https://youtu.be/nRgzO21lrzk?si=FT6xqdNhzTfWDGys

श्री मॉं!

शब्दवेध

‘भाजणे’ आणि ‘भजणे’

मी माझ्या खोलीत काम करत बसले होते. “भाजलेल्या शेंगा खातेस का गं?”, सासुबाईंची हाक आली. “वा! का नाही?” अशी दिलखुलास दाद देत, अर्धा जिना मी उतरले आणि अर्धा जिना त्या चढल्या. ‘दो कदम तुम भी चलो, दो कदम हम भी चले’ हे गीत मनामध्ये दरवळून गेलं.

भाजलेल्या शेंगांचा आस्वाद घेता घेता मनामध्ये नकळत दोन शब्दांनी प्रवेश केला. ‘भाजणे’ आणि ‘भजणे’. आकारविल्ह्यानुसार खरं म्हणजे ‘भजणे’ हा शब्द आधी यायला हवा. मात्र व्यवहारज्ञानानुसार मला ‘भाजणे’ आणि ‘भजणे’ हा अनुक्रम अधिक योग्य वाटला. ”भाजल्याशिवाय माणूस देवाला ‘भजत’ नाही हेच खरं”. असो. असंही देवाला त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. घेणं देणं असतं ते खरं म्हणजे फक्त आणि फक्त माणसाला. परंतु त्याची त्याला जाणीव नसते हेही तितकंच खरं.

      तर गृहिणी या नात्याने 'भाजणे' शब्दाचा विचार करताना मला शेंगा भाजणे, शेंगदाणे भाजणे, भाजीसाठीचा काळा मसाला भाजणे, दिवाळी फराळासाठी चकलीची 'भाजणी' तयार करणे असे खूप काही आठवत गेले. मनाने स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडताच, पाय भाजणे, दूध पोळून तोंड भाजल्यावर ताकही फुंकून पिणे, तोंड बंद ठेवल्यावर मौनाने मन भाजणे, असं बरंच काही साठवणीतलं आठवत गेलं. 
      हे सारं काही 'श्रीकृष्णार्पणमस्तु' करून मी मनाने पुढे निघाले, तेव्हा माझ्या आईने मला भाजण्याची क्रिया पुन्हा एकदा समजावून सांगितली. ती म्हणाली, "अगं बाई, काहीही योग्य रीतीने भाजायचं असेल तर आधी गॅस पेटवून भांडं थोडंसं गरम करून घ्यावं लागतं. एकदा भांडं तापलं की मग मात्र गॅस बारीक करावा. जो जिन्नस आपल्याला भाजायचा आहे तो त्या भांड्यात टाकावा. त्याला हलवण्यासाठी लांब दांडीचं उलथनं वापरावं. योग्य वेळी हलवत आणि गॅस लहान मोठा करत तो जिन्नस मंद आचेवर भाजावा, म्हणजे मग तो आतून भाजला जातो आणि चवीला खमंग होतो. यात आपण काही घाई गडबड केली तर एकतर पदार्थ जळतो तरी नाहीतर कच्चा तरी राहतो. सुगरणीला हे दोन्हीही शोभत नाही बघ."
      किती प्रेमाने आणि सविस्तर सारं काही सांगते आई. आम्ही मात्र तिला सोडून वेड्यासारखं कृष्ण काय,राम काय शोधत राहतो. जिथे त्यांची जन्मदात्री निश्चलपणे, ठामपणाने आणि तरीही कोमल मनाने उभी असते तिथे पुन्हा काही वेगळं 'भजण्या'ची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. 'राम-कृष्णा' माफ करा ; माझ्या विठोबाच्या वारीमध्ये प्रत्येक जीव प्रत्येक क्षणी 'माऊली' म्हणत असतो ना ; तेच खरं भजन - पूजन आणि सारंच काही. पायांनी केलेली वारी काही दिवसांची असते रे पण मनामध्ये अखंड वारी चालू राहिली की, ते श्वास देणारं, सुरू ठेवणारं आणि काढून घेणारं वारं माणसाला कधी लागत नाही बघ. अहंकाराचा वारा टाळला की जो  हुंकार निघतो, त्याला 'ॐ'कार म्हणतात.

संपूर्ण समर्पण माय – माऊली !



•| ॐ |•

मातृ संदेश

जिथे वास करू नये ती ‘वास ना’.

संपूर्ण समर्पण मॉं!



कोणते पसायदान मागावे आता ?

पृष्ठे: 1 2

प्रतिक्रिया व्यक्त करा